अक्षय कर्डिले लोकसभा लढविणार.

नगर ः जिल्ह्यात राजकीय घडामोडी सुरु झालेल्या आहेत. दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाॅ. सुजय विखे यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार या विषयी सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. डाॅ. सुजय विखे यांना डावलण्यात आले तर त्यांच्य जागी अक्षय कर्डिले यांना पक्ष संधी देईल, अशीच चर्चा सध्या सुरु झालेली आहे. 


खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या माध्यमातून दक्षिणेत अनेक विकास कामे झालेली आहेत. मात्र ही कामे करताना विखे यांनी स्थानिक भाजप नेत्यांना विचारात घेतलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून त्यांच्या विषयी नाराजी आहेत. तसेच भाजपचे आजी-माजी आमदार व अनेक पदाधिकारी सुजय विखे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज आहेत.

आगामी काळात पक्षाने दक्षिणेतून उमेदवार बदलावा, अशी मागणी होत आहे. याकडे आता पक्ष किती गांभिर्याने बघतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. डाॅ. विखे यांना डावलले तर भाजपकडून नवीन चेहरा कोण असेल यावर सध्या चर्चा सुरु झालेली आहे. भाजप गोटात अनेकांची नावे घेतली जात आहे.ॉ

आगामी काळात दक्षिणेत लोकसभेसाठी नवीन चेहरा द्यायचा असेल तर अक्षय कर्डिले यांच्या नावाचा पक्षाने विचार करावा, असे मत नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. शिवाजी कर्डिले यांचा दक्षिणेत चांगला संपर्क असून नातेगोत्याच्या माध्यमातून त्यांना फायदा होऊ शकतो, असे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. 

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून कर्डिले यांचा जनसंपर्क वाढलेला आहे. त्याचा फायदा अक्षय कर्डिले यांना निवडणुकीत होईल, असेही मत व्यक्त केले जात आहे. दिवाळ फराळ कार्यक्रमात अक्षय कर्डिले यांनी राजकीय इनिंग लोकसभा निवडणुकीपासून सुरु करावी, अशी अपेक्षा अनेकांनी एकमेकांच्या चर्चेत व्यक्त केली आहे. यावर आता पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post