मनीषा देशमुख
एक फोटो बरच काही सांगून जात असतो. जे शब्दात मांडता येत नाही. ते फोटोतून मांडले जाते. अनेक वाक्य एका फोटोतून व्यक्त केले जात असतात. फोटो मुके वाचतात. मात्र ते बोलत असतात. ज्याला फोटोतील हाव भाव समजातात त्याच्याशीच ते बोलत असतात.
सध्या असाच एक फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत असून महिला तो समाज माध्यमावर स्टेटस ठेवत आहेत. या फोटोतून महिलांच्या मनातील भाव व्यक्त होत असून त्या ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी किती स्ट्रगल करतात, हे त्यातून स्पष्ट होत आहे.
चूल आणि मूल या पुरतेच पूर्वी महिलांना ठेवले जात होते. मात्र कालमानपरत्वे बदल झालेला आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला आता काम करीत आहेत. आता सर्वच क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. परिचर ते उच्च पदस्थ अधिकारी यांच्यापर्यंत महिला कामकाज करीत आहेत.
राजकीय क्षेत्रातही गावपातळीपासून ते थेट लोकसभेपर्यंत व राष्ट्रपतीपदापर्यंत महिला पोहचलेल्या आहेत. हे सर्व पदे महिला यशस्वीपणे पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयापासून ते घरापर्यंतची सर्वच कामे त्यांना करावी लागत आहे. ही सर्व कामे करून महिलांना त्यांनी निश्चित केलेल्या धेयापर्यंत पोहचावे लागत आहे.
हा फोटोच खूप काही बोलून जातो.. शंभर टक्के... एका महिलेचं तिच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठीचं स्ट्रगल असा आशय असलेले छायाचित्र सध्या समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झालेले आहे. महिला ते समाज माध्यमावर स्टेटस ठेऊन आपल्या मनातील भावना त्यातून मांडून पुरुष मंडळीला विचार करायला भाग पाडत आहेत. आम्हाला कोणत्याही क्षेत्रात मिळालेले यश हे किती खडतर श्रमातून मिळालेले आहे. हे यातून स्पष्ट होत आहे.
महिलांच्या मनातील हे भाव व भावना समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रातून स्पष्ट होत आहेत. महिला पुरुषांच्या बरोबरीने कामकाज करीत आहेत. मात्र त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी व निश्चित ध्येय गाठण्यासाठी त्यांना घरातील सर्वच कामे करावी लागत आहे.
कपडे धुन्यापासून ते कपडे इस्तरी करणेबरोबरच स्वयंपाकही करून त्यांना नोकरी करावी लागत आहे. ही सर्व कामे करून त्यांना ध्येस प्राप्ती करावी लागते. मात्र पुरुषांना ध्येय प्राप्तीसाठी त्यांच्या मध्ये काहीच अडथळे नसतात. ते विना अडथळे आपली ध्येय यशस्वी पार पाडत आहेत.
या कामांबरोबरच घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणाचार तसेच मुलांचे संगोपन करावे लागत आहे. ही सर्व कामे विनातक्रार करूनच महिलांना पुढे जावे लागत आहे. अनेक लढाई यश मिळाल्यानंतर काही घरांमध्ये कौतुक होत नाही. महिलेच्या यशानंतर पुरुष कधी कधी दुःखी होतात.
महिलेने घेतलेले कष्ट कोणी पहात नाही. तिचे कष्ट पाहून तिचा सन्मान करणे गरजेचे आहे. एक दिवस महिला दिन साजरा करून उपयोग नाही. महिलांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून कष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने सन्मान करणे गरजेचे आहे.
Post a Comment