आदर्श पत्नी , आदर्श सून , आदर्श माता याही पलीकडे नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर आदराचे स्थान असणाऱ्या नेवासा पंचायत समितीच्या आदर्श माजी सभापती सौ सुनिताताई गडाख यांच्या कार्यपद्धतीने तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे .
महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या अर्धांगिनी सौ सुनीताताई गडाख यांनी आपल्या कार्यक्षम, कार्य कुशल ,कर्तृत्ववान नेतृत्वातून नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये एक नवचैतन्य निर्माण केले आहे. आपले सासरे माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या विचारसरणीतून बाळकडू मिळाल्यानंतर सौ सुनीताताई गडाख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली.
राजळे घराण्याचं माहेर असलेल्या सौ .गडाख यांना राजकारण आणि समाजकारणाचा बाळकडू तसं लहानपणीच मिळालं होतं. सासरी आल्यानंतर ज्यांच्याकडे आदर्श राजकारणी आणि समाजकारणी म्हणून पाहिले जात असे माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांच्याकडूनही त्यांना सामाजिक, भौतिक आणि राजकीय गोष्टींची शिकवण मिळाली .त्यातूनच प्रेरणा घेत गडाख यांनी आपले कार्य सुरू केले.
आपले पती माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत राजकारणाबरोबर समाजकारणाला प्राधान्य देत त्यांनी नेवासा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे .नेवासा तालुक्यातील महिलांसाठी मायेचा आधार म्हणून असलेल्या सौ . गडाख यांनी महिलांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्नाची दखल तालुका जिल्हा नव्हे तर राज्याने घेतली आहे. जवळपास 20 हजार महिला बचत गटाची स्थापना करून महिलांना आर्थिक उन्नतीचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला आहे.
बदलत्या जगाच्या प्रवाहात येण्यासाठी महिलांना विविध कार्यक्रमांद्वारे विद्यमान परिस्थितीची जाणीव करून देत अडचणीच्या काळातही कशा पद्धतीने झगडले पाहिजे याचे शिकवण त्यांनी आपल्या कार्यातून महिलांना दिली आहे .त्यामुळेच काय की महिलांमध्येही एक वेगळी जागृती तयार होऊन नेवासा तालुक्यातील महिलामध्ये स्वावलंबी होण्यासाठी एक नवीन क्रांती उदयास येत आहे.
केवळ महिलांसाठीच नव्हे तर नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार शंकरराव गडाखांच्या बरोबरीने काम करत तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची एक मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे.
स्मायली भवन, निराधारांसाठी आधार, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सौ. गडाख अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळत असल्याने त्यांचा उत्साही द्विगुणित होत आहे. नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या खांद्याला खांदा लावून तालुका विकास कामात सौ . गडाख काम करत आहेत . तालुक्यातील रस्ते, वीज ,पाणी याबरोबरच जनतेचे वैयक्तिक अडीअडचणी सोडवत त्यांनी तालुक्यात एक नवीन बदल घडवून आणला आहे.
त्यातूनच आमदार गडाख यांच्या पाठीमागे तालुक्यातील जनता भक्कमपणे आता उभी ठाकली असल्याने तालुक्यातील विकास कामांना मोठा वेग आला आहे .आजही सौ. गडाख रोज सकाळी आठ वाजता घराबाहेर निघून तालुक्यातील सामान्य जनतेंमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यामुळे उभी राहिली आहे.
सध्या मराठा आरक्षणाचा आंदोलन महाराष्ट्रात वेगाने वाढत असताना सौ . गडाख यांनी यापूर्वीच मराठा आंदोलकासाठी आपल्या सभापती पदाचा अधिकृत राजीनामा दिला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदाधिकारी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या म्हणून त्यांचा उल्लेख आजही केला जातो. चांदा गटा सह कुकाना , भेडा , नेवासा , बेलपिंपळगाव, सोनई , सलाबतपूर खरवंडी आदी गटांमध्ये महिला जनजागृती करण्यासाठी सौ . गडाख अथक परिश्रम घेत आहेत.
महिलाही त्यांच्या पाठीमागे भक्कम पुणे उभे राहत त्यांच्या हाकेला होऊ देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होताना दिसत आहेत. माय माऊली मायेची सावली अशी पदवीच नेवासा तालुक्यातील माता-भगिनींनी सो . गडाख यांना बहाल केली आहे.
Post a Comment