नगर : महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात सध्या तक्रारी वाढत आहे. एक कर्मचारी खोट्या नोंदी लावत असून त्याच्या तक्रारी कोणी केल्या नंतर तो कर्मचरी तक्रारदारालाच दमबाजी करीत आहे. नेत्याची आपल्याला साथ आहे, असे सांगत आहे. त्या कर्मचार्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
राधाकृष्ण विखे यांच्याकडे महसूल विभागाचा कारभार आल्यानंतर त्यात सुधारणा होईल असे वाटत होते. कारभार सुधारण्याऐवजी सध्या बिघडला आहे.
याबाबत अनेकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी आदींकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांनी संबंधितांना कारभारात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. परंतु कारभारात सुधारणा झालेली नाही.
संबंधित कर्मचार्याला नेत्याचा आधार असल्यानेच त्याचा मनस्ताप सर्वसामान्यांना होत आहे. याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याकर्मचार्याच्या तक्रारी अनेक असूनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महसूल मधील नेत्याचा आधार असलेल्या त्या कर्मर्याची वीटभट्टी जोमात सुरु आहे. तसेच इतर उद्योगही बहरलेले आहेत. हे सर्व कामे तो विना अडथळा करीत असून नेता आपल्या पाठीमागे असल्याने आपले कोनीच काही करू शकत नाही असे तो कर्मचारी सांगत आहे.
विशेष म्हणजे त्याने गावात नोकरीला असतानाही अनेक कामे अनाधिकत केली आहे. त्यामुळे या बाबत प्रशासनासह महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे.
Post a Comment