नगर ः आंधळं दळतयं व कुत्र पीठ खातयं असाच कारभार सध्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांमधील काही विभागात सुरु आहे. काही पंचायत समितीतील कर्मचारी नगरहून येऊन जाऊन करीत आहेत. काहीजण नगरला कामे असल्याचे भासवून घरची कामे करून घेत आहे. काही पंचायत समितीतील आवक-जावक रजिस्टरला ठऱावीक लोकांच्या पुढे अशा नोंदी दिसून येत असूनही वरिष्ठ त्याकडे कानाडोळा करीत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राज आहे. या प्रशासक राज काळात कामे वेगाने होतील व कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु ही शक्यता फोल ठऱली आहे. कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्याऐवजी बेशिस्तपणा वाढलेला आहे.
याकडे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे काही कर्मचारी व अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. हा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांमधील काही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. नगर येथून अनेकजणस अपडाऊन करीत आहेत. अनेकदा हे कर्मचारी व अधिकारी आदल्यादिवशी मुख्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे कागदपत्रे घेऊन जात आहे. त्यानंर दुसऱ्या दिवशी ती कागदपत्रे सादर करून उर्वरित वेळ घरगुती कामे करीत फिरत आहेत.
हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हा कारभार कधी सुधारणार असा सवाल कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. नगर राहणारे कर्मचारी मुख्यालयातील कागदपत्रे घेऊन जाण्याचे काम नित्यनियमाने करीत आहेत. यातून त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. (क्रमशः)
Post a Comment