नगर ः लोकसभा निवडणुकीनंतर आता प्रथमच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय फलक लागण्यास सुरवात झालेली आहे. त्यावर सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील चार वर्षे आपण लोक कोठे गेला होता, असा थेट सवाल आता त्या नेत्यासह त्यांचे कार्यकर्ते व पंटरांना केला जात आहे. सर्व सामान्यांकडून होणार्या प्रश्नांच्या भडीमारीला पंटर कंटाळले असून थातूरमातूर उत्तरे देऊन ते वेळ मारून नेत आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत मोठ-मोठ्या घोषणा करण्यता आलेल्यात आहेत. त्यातील काही कामे झालेली आहे. काही कामे प्रलंबित आहेत. आागमी निवडणुकीची शक्यता गृहीत धरून आता नारळ वाढविण्याचे कामे सुरु करण्यत आलेली आहेत. गेली चार वर्षे गायब झालेले नेते मंडळी गावा-गावात आपल्या वरिष्ठ नेत्यांना घेऊन येत आहेत. आता नेते मंडळी सर्व सामान्यांबरोबर सेल्फी काढून गोड बोलून तरुणाईला आपलं करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मागील चार वर्षात नेत्याने काय कामे केली याचा लेखाजोखाच आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विचारू लागलेली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. त्यामुळे पक्षाने आगामी काळात नेतृत्वात बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तशा स्वरुपाचे लेखी अहवाल पाठविला असल्याची चर्चा सध्या अहमदनगर लोकसभा मतदार संघात सुरु आहे्. काही खासगी संस्थांनी सव्हे केलेला असून त्यामध्ये धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत
Post a Comment