नगर ः शेंडी (ता. नगर) येथील तलाठी निकीता जितेंद्र शिरसाठ यांना तब्बल पन्नास हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गजराज नगर येथे पैसे घेत असताना पथकाने तलाठ्याला रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकिता जितेंद्र शिरसाठ (वय-46) तलाठी सजा शेंडी,(वर्ग-3), ता.नगर व संकेत रणजीत ससाणे (वय 26) तलाठी शिरसाठ यांचे खाजगी मदतनीस, रा. निर्मल नगर, तपोवन रोड, अहमदनगर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांचे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी तलाठी शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजाराची लाचेची मागणी केली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 11 डिसेंबर रोजी तक्रार दाखल झाली. त्यानुसार आज रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता यातील शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी 50 हजाराच्या लाचे मागणी करून ती लाच रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे याच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार आज सापळा लावून कारवाई केली.
या दरम्यान भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर, नगर=छत्रपती संभाजी नगर रोड, अहमदनगर येथे आरोपी संकेत रणजीत ससाणे याने तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष 50 हजाराची लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर बाबत दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment