बस अपघातात १५ प्रवासी जखमी....

नगर : नगर- पुणे महामार्गावर लक्झरी बस रस्ता ओलांडणाऱ्या मालट्रकवर जावून आदळली. या झालेल्या  अपघातात बस मधील १५ ते १६ प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता.२९) रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान म्हसणेफाटा (ता.पारनेर) परिसरात हा अपघात झाला आहे.


गुरुवारी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान अहमदनगर पुणे महामार्गावर म्हसणेफाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपा समोर एक ट्रक हा पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना त्याच वेळी पुण्याच्याकडून अहमदनगरच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेली चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस ही त्या वळण घेत असलेल्या ट्रकवर जोरात आदळली. 

या भिषण अपघातात बस चालकासह बस मधील १५ प्रवासी जखमी झाले. यात बस चालक गंभीर जखमी आहे. त्यास अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमीना सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post