वडनेर : अहमदनगर जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धा त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, नेवासा फाटा येथे उत्साहात पार पडली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत चार वर्षांनंतर क्रीडा व्यासपीठ उपलब्ध झाले. मा. शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्ये ठरले...!
इयत्ता पहिली ते पाचवी (लहान गट) व इयत्ता सहावी ते आठवी (मोठा गट) सांघिक प्रकारात कबड्डी, खो खो तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांत धावणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक क्रीडा प्रकारांत तालुक्यातून प्रथम आलेल्या शाळांनी सहभाग घेतला.
अहमदनगर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- कोहकडी ता. पारनेर शाळेतील खेळाडूंनी शाळेच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करीत खो खो व कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात सर्वाधिक यश खेचून आणले.
कोहकडी शाळेकडून सोनाली टकले, खुशाली टकले, साक्षी गोगडे, कल्पना कोळेकर, शिवांजली धरणे, चैताली कोकरे, पूनम कोकरे, रोहिणी करगळ, काजल खंडेकर, शकुंतला टकले, आनंद माने, पृथ्वीराज जाधव, साईराज चौधरी, समीर शिंदे, राजू टकले यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मुली लहान गट- कबड्डी व खो खो - प्रथम क्रमांक. मुले मोठा गट - खो खो - प्रथम क्रमांक. मुली मोठा गट - खो खो - द्वितीय क्रमांक
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक गोकुळ कळमकर, राजेंद्र वाबळे, संतोष गाजरे, कमलेश थोरात, उज्ज्वला काळे, आशा आननकर, वैशाली औटी यांचे मार्गदर्शन लाभले.
कोहकडी शाळेच्या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माजी सभापती सुदामराव पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, भाऊसाहेब काळे, विनेश लाळगे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित ढवण, केंद्र प्रमुख चांगदेव गवळी, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment