नेवासा : नेवासा विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून कोण उमेदवारी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या नेवासा तालुक्यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेत माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यापैकी दोघांना उमेदवार दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्यात पक्ष संघटन केलेले आहे. मात्र हे संघटन करताना त्यांनी बाजूचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला केले असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून होत आहे.
विठ्ठलराव लंघे यांना भाजपाने जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. या माध्यमातून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. नेवासा तालुक्यासह उत्तर जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम हाती घेतलेले आहे.
नेवासा तालुक्यात पक्ष बांधणीत काय अपयश आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लंघे यांच्या ऐवजी नवीन उमेदवाराला अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याऐवजी त्यांना नेवासा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
याबाबत नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याची चर्चा सध्या भाजप वर्तुळात सुरू आहे. कर्डिले यांना नेवासा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तरच तुल्यबळ लढत होईल, असे भाजप कार्यकर्ते बोलत आहेत.
नेवासा विधानसभा मतदारसंघातून आमदार शंकरराव गडाख यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेच हेच एकमेव उमेदवार आहे, अशी चर्चा सध्या भाजप गोटात सुरु आहे.
Post a Comment