गोळीबाराने शेवगाव हादरले....

शेवगाव : येथील शेवगाव-गेवराई मार्गावरील एका हॉटेलजवळ दोघांवर गोळीबार झाल्याची घटना रविवारी (दयता. तीन) रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मात्र, हा गोळीबार कोणी केला केला याची माहिती मिळू शकली नाही. 


या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात  घेतले आहे. त्या ताब्यात असलेल्या इसमाची पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. या घटनेत नेमका गोळीबार कोणी केला? यातील आरोपी कोण? जखमी कोण? याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसदेखील संभ्रमावस्थेत होते.

या घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post