नगर : महानाट्य दोन किंवा जास्तीत जास्त तीन अंकी असते. त्यावर लवकर पडदा पडेल. महानाट्य फार काळ चालणार नाही, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य भूमिकेवर लगावला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर मंत्री विखे पत्रकारांशी बोलत होते. नगर दक्षिण मतदारसंघासाठी महानाट्य आयोजित केले आहे, त्याला महाविकास आघाडीचे पदाधिकारी भेट देत आहेत,
अजितदादा गटाकडून शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी काहीजण उडी मारण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रश्नावर बोलताना मंत्री विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार लंके यांच्या संभाव्य भूमिकेवर टोला लगावला आहे.
विखे म्हणाले की लोकसभेसाठी कोण कुठे जाते, याची मला चिंता नाही. कारण महायुतीला राज्यात शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या मानेवर जाऊन बसते, याला मी फार महत्त्व देत नाही, असे ते म्हणाले.
Post a Comment