हॉटेल चालकाचा खून....

नेवासा : झोपेत असताना हॉटेल चालकाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना श्रीरामपूर- नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव (ता. नेवासा) शिवारात बुधवारी (ता.१३) पहाटे घडली. सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली.


बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६०, रा. कारवाडी (पाचेगाव) ता. नेवासे) असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव

आहे. श्रीरामपूर - नेवासे मार्गावरील लोखंडी फॉलनजीक ओम साई नावाने ते हॉटेल चालवत होते. बुधवारी (ता.१३) पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post