नेवासा : आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे. आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यात काट्याची लढत होणार आहे. ही लढतच व्हावी अशी अपेक्षा सर्वांमधून येत होत आहे.
नेवासे नगर विधानसभा मतदारसंघ असताना माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व शंकरराव गडाख त्यांच्यात लढत झाली होती. या लढतीत कर्डिले यांनी विजय मिळवला होता. त्यात निवडणुकीची पुनरावृत्ती या पंचवार्षिक मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लढतच व्हावी अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान नगर नेवासा विधानसभा मतदारसंघात नेवासा तालुक्यातील मोजकेच गावे होती. त्यामुळे या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला होता. विशेष म्हणजे नगर तालुक्यातील सर्वाधिक गावे या विधानसभा मतदारसंघात होते. त्याचाच फायदा कर्डिले यांना झाला होता.
आता संपूर्ण तालुका गडाख यांचा आहे. त्यामुळे चित्र काय असेल असा प्रश्न उपस्थित होत असला तरी कडील यांचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे ही लढत व्हावी अशी अपेक्षा सर्वांचे आहे.
नेवासे तालुक्यात भाजपाचे सक्षम नेतृत्व राहिलेले नाही. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांच्या सारखाच सक्षम नेता नेवासा तालुक्यातील यावा, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. कर्डिले नेवासात आल्यानंतर भाजपाची पक्ष बांधणी मजबूत होईल, असेही कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
सध्या नेवाशात पक्षाचे कार्यक्रम घेताना अनेक अडचणी येत असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. जे भाजपमुळे मोठे झाले तेच भाजपच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. या कार्यक्रमाची वेळी होणारा खर्चही देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
Post a Comment