विखे यांचे बोल जिल्ह्यातील विखे विरोधकांना साधावा लागणार तोल...

नगर : कोणाला किती मोर्चे व आरोप करायचे ते करू द्या, या आरोपांना आपण दोन महिन्यांनी उत्तर देऊ,असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. या इशारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


दोन महिन्यानंतर विखे काय भूमिका घेतात याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. यावरूनच विखे यांना खासदारकीची उमेदवारी मिळेल अशी चाहूल त्यांना लागली असेल म्हणूनच त्यांनी असा इशारा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राजकीय दृष्टिकोन ठेवून कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप भाजपचे विवेक कोल्हे यांनी केला होता. 

यासंदर्भात त्यांनी शुकवारी (ता.एक) शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष वेधले. यावेळी व्हिडिओ कॉल यांनी टीकाही केली होती. या टिकेला विखे यांनी आता उत्तर दिले आहेत्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विखे यांच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक नेते उभे राहत आहेत. त्यांच्या विषयी बोलत आहे.  काहींनी तर पक्षश्रेष्ठीकडे ही तक्रारी केलेल्या आहेत. त्याचा परिणाम आगामी काळात दिसून येणार आहेविकी यांना उमेदवारी नाकारली असलेली चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मात्र त्यांच्या राहत्यातील वक्तव्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विखे यांच्या तोंडातून दोन महिन्यानंतर सर्व आरोपांना उत्तर देऊ असे वक्तव्य निघाले आहे. या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांना सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. आपण आगामी दोन महिन्यात लोकसभा निवडणूक विजयी झाल्यानंतर सर्वांना धडा शिकवू असा इशारा त्या़ंनी दिला आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post