नगर : राज्यातील मागील काही नाट्यमय घडामोडीनंतर सर्वच पक्षात उलथापालथ झालेली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट तयार झालेले आहे. त्याचा परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
भाजपाला फायदा होईल असे वाटत असले तरी सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे.
राज्यातील जागा वाटपाचा घोळ मिटलेला आहे.राष्ट्रवादीच्या काही जागा भाजपाकडे तर भाजपाच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विद्यमान खासदारांना दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ आलेली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाकडे असलेली जागाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार आहे त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राणी लंके किंवा नीलेश लंके यांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा कोण उमेदवार उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे बीजेपी कडून मतदारसंघात कोणी उभे राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतची चर्चा सध्या बीजेपी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात विषषी चर्चा सुरू झाली आहे. यामतदार संघात पुन्हा घड्याळाचा काटा फिरणार आहे, अशी चर्चा सध्या अजित पवार गटात सुरु आहे.
Post a Comment