जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तो पर्यत कोणत्याही पक्षाला मतदान नाही

नगर ः येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कोहिनुर मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीत अनेक ठराव करण्यात आले. यामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणात नाही तो प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत येणार्‍या प्रत्येक निवडणुकीला मराठा समाजाचे हजारो उमेदवार उभे करणार, तसेच एसआयटी चौकशी बाबत करोडो मेल केंद्र सरकार राज्य सरकारला पाठवणार असल्याचे यावेळी बैठकीत ठरले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने दोनही ठराव मंजूर करण्यात आले.


नगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आज कोहिनूर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठया संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. 

दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर शपथ घेण्यात आली यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची असणारी सगे सोयरे बाबत मागणी बाबत कायदा पारित करत नाही आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. 

तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला

यावेळी राम जरांगे, अ‍ॅड.गजेंद्र दांगट, गोरख दळवी, अमोल हुंबे, मदन आढाव, गिरीष भांबरे, अनिकेत आवारे, स्वप्नील दगडे, भाऊ दिघे, शाम वाघस्कर, राजेश काळे, विलास शिंदे आदीसह स्वयंसेवक यावेळी हजर होते.

तसेच येणार्‍या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे समन्वयक यांच्या वतीने देण्यात आली आहे.

मनोज रंगे पाटील हे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून उपोषण करतात मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असून जरांगे पाटलांच्या उपोषणा संदर्भात सरकारने डखढ चौकशी करण्याचे ठरवले असल्याने त्या आंदोलनाचा आम्ही देखील भाग असून सरकारने आमची देखील चौकशी करावी या संदर्भात सरकारला मेल करण्यात येणार असल्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post