नगर : जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचा कारभार आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात असाच सुरू आहे. या कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडे इतर विभागांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या काही रकमा कपाती करून ते चलन व विवरण पत्र अर्थ विभागाकडे सादर केलेले आहेत. मात्र त्या चलन व विवरण पत्र सापडत नसल्याचे उत्तरे कर्मचार्यांना दिली जात आहेत. चलन व विवरण शोधण्याची जबाबदारी अर्थ विभागाची जबाबदारी आहे. मात्र ती जबाबदारी अर्थ विभाग झटकत आहे.
या उलट मात्र ठेकेदारांची बिले तातडीने या विभागात मंजूर केली जातात. ठेकेदारांच्या बिलातील एकही कागद या विभागातून गहाळ होत नाही हे विशेष. विशेष म्हणजे ठेकेदारांच्या बिलांच्या फायली अद्यावत ठेवल्या जातात. या फाईलचे कव्हरही नीटनेटके राहते.
त्या उलट कर्मचाऱ्यांच्या फाईलअनेक ठिकाणी फाटलेले दिसून येत आहे. या फाईलची निगाही अर्थ विभागाककडून ठेवली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अर्थ विभागाच्या कारभार नेहमीच कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांना तुमच्या चलन व विवरण पत्र शोधून आणा मग तुम्हाला त्याचा लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही असे सांगितले जात आहे. नोंदीची जुळवा जुळवा झाली तरच तुम्हाला तो फरक मिळेल अन्यथा मिळणार असे अर्थ विभागातून सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचार्यांना रेकॉर्ड शोधण्याची वेळ आली.
यामुळे मात्र कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अर्थ विभागातील काही कामे ठेकेदारी पद्धतीने देण्यात आली होती. त्या संबंधित व्यक्तींकडून त्या चुका झालेले आहेत्याचा मनस्ताप आता कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यात सुधारणा न झाल्यास अर्थ विभागाच्या तक्रारीच वरिष्ठांच्या कानावर घालण्यात येतील अशी चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरु आहे.
विभागातील फायली अद्यावत करण्याचे काम ज्या एजन्सीला दिले होते. कारवाई करूनकाळजी टाकावी अशी मागणी होत आहे. एजन्सी कोणाच्या पुढाकारातून नियुक्त केली. ती एजन्सी नियुक्ती केली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment