वर्गणी करून बुजवलं त्या कार्यक्रमाचे बिल

नेवासा : नाव मोठं लक्षण खोटं या म्हणीचा प्रत्यय एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना आलेला आहे.  पक्षाच्या वतीने हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मात्र या कार्यक्रमात झालेल्या चहापाण्याचा खर्च वरिष्ठ नेत्यांनी न दिल्यामुळे कार्यकर्त्यांना बुजवण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वांनी वर्गणी ही केली. याविषयी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.


राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटला की मोठा गाजावाा केला जातो. तसाच गाजावाजा शहरातील एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आला होता. या कार्यक्रमाला  जिल्ह्यातील काही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पक्षाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी मोठमोठी भाषणे केली. तळागाळातील कार्यकर्त्यांना बर देण्याचे व त्यांनापरत नेण्याचेमान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले. मान्यवरांच्या भाषणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. होते. 

भाषण झाली, कार्यक्रम संपला. नेतेमंडळीत्याच्या मार्गाला मार्गस्थ झाली. तालुक्यातील पदाधिकारी ही आपआपल्या  कामानिमित्ताने  कार्यक्रम स्थळ निघून गेले. मात्र कार्यक्रमाचे नियोजन करणारे मोजकेच कार्यक्रम स्थळी पाच ते सहा जण राहिले. प्रत्येक जण जाताना तपासा जणांना कार्यक्रम चांगला झाला नियोजन उत्कृष्ट होते असे सांगून कार्यक्रमस्थळावरून गेले.

कार्यक्रमाच्या वेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या चहापाण्याची बिल नेत्यांसह त्याच्या प्रमुख नेत्यांनी दिले नाही. त्यामुळे येथील सर्वसामान्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते बिल बुजविण्याची  वेळ आली.  नेत्यांचा या वागण्याला कार्यकर्त्ये कंटाळले आहेत.

हा सर्व प्रकार नेवासे तालुक्यातील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना आला आहे. असाच अनुभव त्या कार्यकर्त्यांना कायम येत आहे. या वर्गणीची तालुक्यासह जिल्हाभर चर्चा रंगलेली आहे. मात्र तालुक्यातील ते नेते मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post