नगर : ऐतिहासिक नगरच्या भूमीमध्ये जन्मलेल्या, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव संपूर्ण देशामध्ये आदर्श प्रशासक म्हणून संपूर्ण देशवासीयांना परिचित आहे.
देशभरातील अनेक मंदिरे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था विहिरी बारवा बांधल्या, धार्मिक महत्त्व असणाऱ्या नद्यांवरील घाट असे अलौकिक कार्य केले. महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याबाबतचा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव संमत झाला.
मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपच्या राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा भानुदास बेरड यांनी दिली.

Post a Comment