नवी दिल्ली : भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा पक्षाने 2024 लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली आहे.
आज बुधवारी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने जवळपास 100 उमेदवारांची दुसरी यादी घोषित केले असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत.
याला काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकारणात खासदार सुजय विखे यांना उमेदवारी मिळणार नाही याची चर्चा सुरू होती. मात्र आजही उमेदवारी जाहीर झाल्याने सर्व चर्चांनापूर्णविराम मिळाला आहे. आता सुजय विखे यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
खासदार सुजय विखे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपमधील अनेक नेत्यांनी प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले आहे. विकी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपच्या गोटात काही कृषी काही गम अशी अवस्था झालेली आहे.
रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकनाथ खडसे यांच्या रक्षा खडसे सुनबाई आहेत. त्याचबरोबर नागपूर मधून नितीन गडकरी. बीड मधून पंकजा मुंडे. अकोल्यातून अनुप धोत्रे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ. नंदुरबार हिना गावित, सुभाष भामरे, नगर मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर. जाहीर झाली आहे.

Post a Comment