अमरावती ः खरंतर नितेश राणे यांची रक्त तपासणी केली पाहिजे. आमदार बच्चू कडू 20 वर्षे अपक्ष लढत आहे. ना झेंडा आहे, ना नेता आहे. आमचा नेता मुंबई, दिल्लीत बसलेला नाही. आमचा नेता गावात बसलेला आहे, अशा शब्दात बच्चू कडू यांनी नितेश राणे यांना सुनावले.
बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही अमरावतीतून माघार घेणार नाही. आमचा स्वाभिमान आहे. आम्ही बुडालो तरी चालेल, पण स्वाभिमान जाता कामा नये. गुलामीत राहण्याची आम्हाला सवय नाही. हम मर जाएंगे. कर जायेंगे. लेकिन ताकद से लढेंगे, असा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप हा फार मोठा पक्ष आहे. मी अमरावतीत उमेदवार दिल्याने एवढ्या मोठ्या पक्षावर फार फरक पडणार नाही. नितेश राणेंसारखा हलक्या कानाचा मी नाही. बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही. त्यांचा बाप असू शकतो. माझा नाही. कुणाचा फोन आला, काही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. आमचा बाप शेतमजूर आहे. आम्हाला थांबवण्याची ताकद भारतात कुणात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडतात की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असे झाले तर भाजपच्या हातून अमरावतीची जागा जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
Post a Comment