अमरावती ः बच्चू कडूंचा राजकारणात कोणी बाप नाही. सागर बंगल्याची भीती नितेश राणेंना असेल, आम्हाला नाही, असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला आहे.
जून बैठक झाली नाही. बच्चू कडू नावाचं वादळ आमच्या सागर बंगल्यात शमवल जाईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. नितेश राणे यांच्या या टोल्याला बच्चू कडू यांनी जोरदार उत्तर दिलेआहे. आता राणे कडू यांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु कडू यांनी मांडलेली भूमिका सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.
नितेश राणे हे कोणी काही मुद्दा उपस्थित केला की लगेच त्यावर प्रतिक्रिया देत आहे. भाजपमधील वरिष्ठांनी बोलणे उचित आहे. परंतु राणेच मध्ये बोलत आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेकजण भाजपच्या या नेत्यावर नाराज आहेत. अशा व्यक्तींना पक्षाने दूर ठेवावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून होत आहे.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर करतो. त्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. पण आमचाही पक्ष आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची आहे. आमची लढत मैत्रीपूर्ण असेल. बच्चू कडू युतीचा धर्म पाळत नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला वाटत असेल तर त्यांनी खुशाल कारवाई करावी, असे ते म्हणाले.
साडेतीनशे गुन्हे...माझ्यावर साडे तीनशे गुन्हे आहेत. बच्चू कडू कुणाला घाबरत नाही. कारवाई म्हणजे काय आंडूपांडू आहे काय? असा सवाल त्यांनी केला.
Post a Comment