नवी दिल्ली ः लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजून किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येते.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील कारवाईविरोधात इंडिया आघाडी एकजुटीने उभी आहे, शरद पवार यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे.
या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. आता त्यांना अटक करण्यात आली असून त्यांचा आजता मुक्काम ईडी कार्यालयात असणार आहे.
Post a Comment