नगर ः डाॅ सुजय विखे यांनी या पुढचा प्रचार इंग्लिशमध्येच करावा तसेच शेतकरी, सामान्य नागरिकांनाही इंग्लिशमध्येच बोला अन्यथा कामे करणार नाही, असे सांगावं असा टोला शिवसेना ठाकरे गटाने लगावला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्लिश बोलण्यावरून टीका केली.
लंके यांनी आपल्यासारखे इंग्रजी भाषण करून दाखवावे आपण उमेदवारी अर्जही भरणार नाही. असे आव्हान त्यांनी दिले. विखे यांच्या या आव्हानानंतर सोशल मीडियात लंके समर्थक आक्रमक झाले आहेत. नगर शहर शिवसेनेच्या फेसबुक पेजवर विखे यांना डिवचण्यात आले आहे.
विखे यांच्यावर आता सर्वच स्थरातून टीका होऊ लागलेली आहे. ज्यांच्या पक्षाचे पंतप्रधान हिंदीतून बोलतात त्यांनी इतरांकडून इंग्रजीत बोलण्याचा आग्रह का धरावा. विखे यांनी अगोदर आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांना इंग्रजीत बोलण्याचे आवाहन करावे, त्यानंतर त्यांनी लंके यांना आवाहन द्यावे, असे मत अऩेकांनी समाज माध्यमावर मांडले आहे.
विखे यांच्या एका वक्तव्याने पक्षाची प्रतीमा मलीन होत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांमधून व्यक्त होऊ लागेली आहे.
Post a Comment