लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या रणधुमाळीत आता सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आपली भाषा व आपली संस्कृतीचा या आता नेते मंडळीला विसर पडू लागलेला आहे. क्षणीक आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय धुराळा उठत आहे. हा धुराळा मात्र सर्वसामान्यांच्या मनावर विपरीत परिणाम करीत आहेत.
मराठीत पाट्या असाव्यात म्हणून शिवसेनेसह मनसेने राज्यात आंदोलन केलेले आहे. आता त्याच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराला इंग्रजी बोलून दाखवा उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे वक्तव्य झालेले आहे. या वक्तव्याचा सर्वच स्थरातून निषेध होत आहे. महाराष्ट्रात आता विधी महाविद्यालयातही अभ्यासक्रम मराठीत आलेला आहे.डाॅक्टरांनीही औषधे मराठीत लिहावी, असा विचार पुढे येत आहे.
त्याच महाराष्ट्रात एखाद्या उमेदवाराला इंग्रजीत बोलून दाखविण्याचे आव्हान देणे कितपत योग्य आहे, असा थेट सवाल समाज माध्यमांवर अनेकांनी केलेला आहे. या इंग्रजी भाषणावरून सध्या भाजपचे उमेदवारासह संपूर्ण पक्ष नेटकऱ्यांच्या रडारावर आलेला आहे.
भाजप उमेदवाराकडून असे वक्तव्य यायला नको होते, असे मत अऩेकांनी समाज माध्यमावर व्यक्त केलेले आहे. तसेच काहींनी इंग्रजीच्या मुद्यावरून धारेवर धरलेले आहे. इंग्रजी येणे गरजेचे आहे. परंतु जर मतदार मराठी बोलत असतील तर मग इंग्रजी येण्याचा प्रश्न काय व कसा उदभवत आहे.
संसदेत मराठी बोलायचं की इंग्रजी बोलायचं हे निवडून आल्यावर ठरणार आहे. परंतु आता तो मुद्दा उपस्थित करून एखाद्याला हिनवणे चुकीचे आहे. आगामी प्रचारादरम्यान असे बेताल वक्तव्य सर्वच राजकीय पक्षांनी करून स्वतःचे व स्वतःच्या पक्षाचे हसू करून घेऊ नये, असे मत व्यक्त केले जातल आहे.
Post a Comment