कर्जत ः भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांना इंग्रजी बोलून दाखवण्याचे आव्हान देत भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वादाला तोंड फोडले आहे. आमदार रोहित पवार यांनी विखेंच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करीत टीका केली आहे.
आमदार पवार यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही, असे ते म्हणाले.
भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील, असे ते म्हणाले.
Post a Comment