शिर्डी ः शिंदे गटाने उमदेवार बदलावा, अशी मागणी महायुतीकडून होत आहे. मागील दहा वर्षात लोखंडे यांनी विकास कामे केलेली आहेत. मात्र ती कामीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोखंडे यांना हटवा व स्थानिकाला बसवा,. असे आवाहन आता महायुतीतील काही कार्यकर्त्यांमधून केले जात आहे.
महायुतीने उमेदवारी देताना सर्व बाबींचा अभ्या करून उमेदवारी देणे गरजेचे होते. मात्र तसा कुठलाच विचार केला नाही. त्यामुळे आता लोखंडे यांच्या उमेदवारीला अऩेकांनी विरोध केला आहे. याबाबत अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु शिंदे गटाने खासदार सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. बाहेरचा हटवा आपला माणूस बसवा, असा नारा आता कार्यकर्त्यांनी देण्यास सुरवात केलेली आहे.
सलग दहा वर्ष खासदार म्हणून सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात काम करीतआहेत. मात्र त्यांचा जनसंपर्क कमी आहे. यामुळेच या मतदार संघात खासदार दाखवा व बक्षीस मिळवा, असे फलक लागले होते. यावेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खासदार लोखंडे यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशीच मागणी कार्यकर्त्यांम|धून होती. तसे पत्रही काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला दिले होते. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
Post a Comment