अतुल लहारे
नगर ः इंग्रजी बोलणारा नको... आम्हाला मतदार संघात राहणारा खासदार हवायं, मराठीत बोलणारा व कार्यकर्त्यांसह मतदारांच्या संपर्कात राहणारा... सदैव काॅल घेणारा खासदार आम्हाला हवाय असा संदेश समाज माध्यमावर व्हायर केला जात आहे. हा संदेश महायुतीतील नाराज गटासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके व खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. आजच्या घडीला आमदार नीलेश लंके यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी विखे पितापुत्रांवर टीका करून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.
हे नक्की वाचा ः लोखंडे यांना हटवा.. कार्यकर्त्यांचा नारा...
लंके यांना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून चांगलीच साथ मिळत आहे. सर्वांनीच त्यांच्या प्रचाराची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. आता लंके यांच्या प्रचाराची धुरा भाजपमधील नाराज मंडळी संभाळू लागली आहे. दिवसा विखे यांच्याबरोबर फिरून काहीजण रात्रीचा लंके यांचा प्रचार करीत असल्याची चर्चा जोरदार सुरु झालेली आहे.
मागील पाच वर्षात विखे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवल्याने व भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावलून विरोधी गटातील कार्यकर्त्यांना जवळ केल्यामुळे अनेकजण नाराज झालेले आहे. हीच नाराजी आता विखे यांना अडचणीत आणत आहे. स्वतः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे नाराजांची भेट घेऊ नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात त्यांना यश आलेले दिसून येत नाही.
Post a Comment