नगर ः मागील काही वर्षे यात्रा-जत्रात हेलिकाॅप्टरला मागणी होती. मात्र यंदाच्या वर्षी आता यात्रा-जत्रातून हेलिकाॅप्टर विक्रीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. सध्या दुचाकी व चारचाकीची खरेदी करून मुले खेळताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी सर्वांमध्ये हेलिकाॅफ्टरची क्रेस होती. लहानापासून थोरा-मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हेलिकाॅप्टरच्या प्रेमात पडले होते. काहींनी जिल्ह्यातील यात्राव इतर कार्यक्रमाच्या वेळी हेलिकाॅप्टर सफारी सुरु केली होती.
त्याचाही जिल्ह्यातील अनेकांनी लाभ घेतला होता. परिणामी ही हेलिकाॅप्टरची क्रेस वाढत चालली होती. मोठ्यांबरोबरच लहान मुलेही यात्रेतून हेलिकाॅप्टर खरेदी करून आपणही हेलिकाॅप्टरमधून फिरणार असे स्वप्न रंगू लागले होते.
यात्रेमध्ये हेलिकाॅप्टरची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु कालांतराने हेलिकाॅप्टरची क्रेस कमी झालेली असून आता दुचाकी व चारचाकी वाहनांकडे सर्वजण आकर्षित झालेले आहे. याचीच चर्चा सध्या सुरु झालेली आहे. यात्रा व जत्रातील खेळणे विक्रेत्यांकडून हेलिकाॅप्टर सध्या विक्री होत नसल्याने हेलिकाॅप्टरवर सध्या धूळ साचल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिल्हयातील खराब रस्त्यांच्या प्रश्नी अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु त्यात सुधारणा झालेली नाही. ग्रामीण भागात मुलांचे खेळण्यातील हेलिकाॅप्टर पाहून अनेकांनी टीका-टिपन्नी केली. नाही रस्ते निट झाले तर हेलिकाॅप्टरने फिरू असेही उपासात्मक अऩेकजण बोलत होते. आताही त्याच टीका-टिपन्नी सुरु आहेत.
Post a Comment