भाडेकरू हवा की घरमालक...जिल्ह्यात चर्चेला उधाण...

अतुल लहारे

नगर  ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झालेली आहे. महाविकास आघाडी अन् महायुती यांच्यात खरी लढत होत असली तरी इतर पक्षाच्या नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीत चुरस निर्माण केलेली आहे. यामुळे निवडणुकीत रंगत वाढलेली आहे. मात्र सध्या जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये एकच विषय चर्चेला सुरु असून भाडेकरू हवा की घरमालक हवा हाच विषय आता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असून नेमका विकास कोठे व मोठे कार्यक्रम कोठे झाले असाच सवाल एकमेकाला केला जात आहे.


लोकसभा निवडणुकीत देशातील कोणतीही व्यक्ती कोठेही उभे राहून निवडणूक लढवू शकते. मात्र निवडून आल्यानंतर त्या व्यक्तीने मतदारांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वाला पात्र राहणे गरजेचे आहे. मात्र सध्या तसे होत नसल्याच्या तक्रारी मतदारांमधून होत आहे. विशेष करून अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातील याबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याचे सध्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे. या प्रतिक्रियांमुळे सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सर्वच ठिकाणी आघाडीवर दिसून येत आहे. ही आघाडी कायम टिकवून 
ठेवण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांध्ये भाडेकरू अन् घरमालक याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. ही दबक्या आवाजातील चर्चा आता पारावर येऊन पोहचली असून गावा-गावात याबाबत चर्चा सुरु झालेली आहे. एखाद्या घरात भाडेकरू रहायला आला तर तो त्या घऱाची देखभाल दुरुस्ती करत नाही. मात्र त्याच घरात जर घरमालक आला तर तो घराची देखभाल दुरुस्ती करून घर कसे टापटीप राहिल, या दृष्टीने प्रयत्न करीत असतो. मात्र भाडेकरू तसे कधी करत नाही. त्यामुळे अनेकजण घर भाड्याने देताना घराची देखभाल दुरुस्ती करावी व घरासह परिसरातही निगा ठेवावा, अशी अट घालून भाडेकरूकडून करार करीत असतो. 

कराराची नियम व शर्ती मोडल्यास त्या भाडेकरूकडून अनामत रक्कम घेतलेली वजावाट केली जात आहे. त्यातूनच घरमालक घराची दुरुस्ती करीत आहेत. मालक रहात असल्यानंतर घऱासह अंगणही चांगले रहात आहेत. तीच परिस्थिती आता अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातही तीच परिस्थिती झालेली आहे. बाहेरील उमेदवार महायुतीचे मतदारसंघात असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघाचा विकास म्हणाव तसा अद्याप झालेला नाही.  मात्र ,महायुतीकडून विकास झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो झालेला नाही. जी कामे दिसत आहेत. ती पाच वर्षाच्या तुलनेत कमी आहेत. 

या मतदारसंघात घरमालक (स्थानिक) नसल्यानेच विकासाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे. भाडेकरू म्हणून आलेले त्यांचा मतदारसंघ खुला होण्याची वाट पहात आहे. तो आगामी काळात खुला होणार आहे. त्यामुळे आता पाच वर्षे भाडेकरू म्हणून राहणारे विकास साधतील का असा सवाल आता मतदारांबरोबरच महायुतीच्या नाराज गटाकडून सवाल केला जात आहे. त्याचा उमेदवारांना नक्कीच फटका बसणार आहे. हा फटका बसू नये, यासाठी आता प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहे. मात्र त्यात त्यांना अपयशयेत आहे. 

महायुतीच्या संबंधितांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात कामे काही प्रमाणात करून सन्मानाच्याबाबी आपल्या हक्काच्या मतदारसंघात नेऊन स्वतःचा जयजयकार करून घेतला आहे. हीच बाब सगळ्यांना खटकलेली आहे. मात्र त्यावर महायुतीतील नेते एकही शब्द बोलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदरवांमागे कार्यकर्ते हे संबंधितांच्या गावाकडीलच असल्याचे स्पष्ट होत आहे. 

मागील पाच वर्षात भाडेकरूंनी घरात राहून काय कामे केली याची लेखाजोखा त्यांनीच मांडावा, असा सवाल आता कार्यकर्त्यांसह मतदारांमधून केला जात आहे. सर्वसामान्य मतदारांसह आता कार्यकर्त्यांमध्ये हीच बाबत चर्चेत येत असून घरमालक हवा की भाडेकरू असा सवाल केला जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post