नगर ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु झालेली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये प्रचाराने जोर धरलेला असला तरी श्रीगोंदे तालुक्यातील नेते मंडळी सध्या शांत दिसून येत आहे. श्रीगोंदेकरांचे शांत राहण्याचे कोडे कोणालाच उलगड नसल्याचे बोलले जात आहे. श्रीगोंदेकरांवर आता आगामी खासदारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे व आमदार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. एक एक मतासाठी उमेदवार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. राज्यातील ही प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे.या लढतीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढळवून निघालेले आहे.
महायुतीसह महाआघाडीतील नेते नेमके कोणाच्या बाजूने आहे, हे कोणालाच समजत नाही. विशेष करून श्रीगोंद्यातील नेते नेमके कोणाच्या बाजुने आहेत, हे स्पष्ट होत नसल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. नेत्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्तेही आता कोणाचा झेंडा हाती घेऊन असा विचार करून गप्पच आहेत.
श्रीगोंदे तालुक्यात महायुतीचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र महायुतीतील पक्षांचे नेते मंडळी प्रचारात फारशी सक्रीय दिसून येत नाही. त्यामुळे महायुतीतील श्रीगोंद्यातील नेते नाराज असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्याचा फटका होण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
श्रीगोंदे तालुक्यात महाविकास आघाडीची ताकद कमी दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांकडूनही ठोस भूमिका घेण्यात आलेली दिसून येत आहे. सध्या या मतदार संघात उमेदवार त्यांचेच कार्यकर्ते सध्या प्रचार करताना दिसून येत आहे. नेते मंडळी कधी तरी प्रचारात सक्रीय झाली असल्याचे जाणवत असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
श्रीगोंद्यातील नेते महायुतीसह महाविकास आघाडीला साथ देत नाही. त्यामुळे या नेत्यांची साथ नेमकी कोणाला राहणार अशीच चर्चा सध्या कार्यकर्त्यांध्ये सुरु आहे. श्रीगोंदेकरांनी नाराजी आहे, हे स्पष्ट आहे. ते अऩेक कार्यक्रमांम|धून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्याच नाराजीचा हा परिणाम असण्याची शक्यता आहे. नाराजी दूर न झाल्यास त्याचा फटका उमेदवाराला नक्कीच बसणार आहे.
Post a Comment