अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या व भाजपच्या उमेदवारांच्यात लढत आहे . मात्र या रणधुमाळी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बरोबर कुठेच दिसत नसल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ सुजय विखे पाटील (भाजप) व माजी आमदार नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) यांच्यात जोरदार टीका टिपण्णी चालू आहे. दोन्ही नेत्यांनी श्रीगोंदा तालुका पिंजून काढला आहे. या दौर्यात नीलेश लंके यांच्या बरोबर उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, काॅंग्रेस गट, मित्रपक्ष बरोबर दिसत आहेत.
मात्र डॉ सुजय विखे पाटील यांच्या बरोबर आमदार बबनराव पाचपुते गट पूर्ण ताकदीने उभा दिसत असताना महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. विखे यांची उमेदवारी आहे. या महायुतीमध्ये शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व मित्र पक्ष सहभागी असताना श्रीगोंदा तालुक्यातील गावभेटी दरम्यान भाजपचे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांच्याच खांद्यावर प्रचाराची धुरा दिसत आहे.
मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे. यांची यंत्रणा कुठेच सक्रिय दिसत नाही. त्यामुळे नाहाटा- नागवडे गटाचे कार्यकर्ते सध्या संभ्रमात दिसत आहेत.
Post a Comment