तनपुरे बंद पाडण्याचे पाप कोणाचे... राहुरीकरांचा सवाल ः बाजारपेठे झाली सुनीसुनी

राहुरी ः तनपुरे सहकारी साखऱ कारखाना बंद पाडण्याचे पाप कोणी केला, असा सवाल आता राहुरीकरांमधून केला जात आहे. त्याचे उत्तर संबंधितांनी द्यावे मगच आमच्याकडे मते मागायला यावे, असा इशाराचा आता राहुरी तालुक्यातील अनेक गावातील मतदारांमधून दिला जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तनपुरेचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.


तनपुरे सहकारी साखऱ कारखाना मागील लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुरु झाला होता. त्यानंतर तो बंद पडलेला आहे. हा कारखाना नेमका कोणामुळे बंद पडला हे सर्वांना माहिती आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचा इतिहास सर्वांसमोर येऊ लागलेला आहे. 

मताच्या पेटीच्या मागील निवडणुकीच्या अगोदर कारखान्याचा विषय़ पुढे आणून तो सुरु करण्यात आला होता. मात्र काम झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसे. ऊस उत्पापदकांनाही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

हक्काचा कारखाना असतानाही इतर ठिकाणी ऊस गाळपाला द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरु व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र त्याकडे कोणीच गांभिर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कारखाना असाच बंद राहिला तर मशिनगरीची नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे कारखाना सुरु करताना आागामी काळात अडचणीत होत आहे. 

तनपुरे कारखाना बंद असल्यामुळे येथील बाजारपेठेतील उलाढाल कमी झालेली आहे. त्याचा फटका व्यापार्यांना बसलेला आहे. दवर्षी काही लाखांमध्ये होणारी उलाढाल कमी झालेली आहे. त्यामुळे काहींनी इतरत्र व्यवसाय सुरु केलेले आहेत. राहुरी कारखाना सुरु व्हावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

बंद पडलेला कारखाना जो सुरु करून ्आगामी पाच वर्षे चालविण्याचे लेखी आश्वासन देईल, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असा निर्धार राहुरीकरांनी व्यक्त केला आहे. तशी चर्चा सध्य़ा गावा-गावात सुरु आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कारखाना चांगलाच डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post