नगर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक विकास र्कायकारी सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित कर्ज तीन लाखापर्यंतचे कर्जावरील वसूल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.
शासनाच्या सहकार खात्याच्या १४ मार्च ते २७ मार्च २०२४ परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील रक्कम तीन लाखापर्यंतच्या व्याज वसूल न करण्याबाबतच्या सूचना सर्व जिल्हा बँकांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार बँकेने २८ मार्च २०२४ रोजीचे परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याज वसूल न करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.
तथापि, प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांनी त्यांना सदरहू परिपत्रक मिळण्यापुर्वी नियमित पिक कर्ज परतफेड करणार्या शेतकरी सभासदांकडून पीक कर्जावरील व्याज वसूल केलेले होते.
याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत वृत्तपत्रांमध्ये व्याज वसुल न करण्यासंदर्भाने बातमी प्रसिध्द केलेली होती. तसेच पिक कर्जावरील व्याज वसुल केलेल्या सर्व संस्थांमार्फत सभासद निहाय माहिती मागविणेबाबत शाखा व सोसायट्यांना एक एप्रिल २०२४ रोजीचे परिपत्रकानुसार सुचना देखील दिलेल्या आहेत.
सदरहू परिपत्रकानुसार माहीती संकलीत करण्याचे काम चालु असुन त्यानुसार वसूल केलेले व्याज लवकरच संबंधित कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्यात येणार आहेत.
याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी १५ एप्रिल २०२४ रोजी बँकेचे संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या शेतकरी सभासदांनी दि.३१ मार्च २०२४ पर्यंत विहीत मुदतीत पिक कर्ज नियमित भरणा केलेला आहे अशा सर्व शेतकरी सभासदांना नियमानुसार खरीप पिक कर्ज त्वरीत वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यापुढे देखील जे शेतकरी सभासद मागील पिक कर्जाची परतफेड करतील अशा सभासदांना देखील त्वरीत कर्ज वितरीत करण्यात येईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.
Post a Comment