राज्यात आगामी पाच दिवस पावसाचे

मुंबई ः राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी सर्वत्र राजकीय धुराळा उडालेला आहे. हा धुराळा शांत होण्यासाठी आता अऴकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. 


राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडणार असताना तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. त्याचा परिणाम पावसावर होणार आहे. 

पाच ते आठ एप्रिल दरम्यान उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांत पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्य तोंडचे पाणी पळाले आहे. हा पाऊस झाला तर त्याचा परिणाम पिकांवर होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका आंबाच्या बागांना होणार आहे.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. शेतात काढून ठेवलेले रब्बी पीक वाया गेले होते. आता पुन्हा पाऊस होणार असल्याने आणखी नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post