नगर ः महायुतीकडून खासदार डाॅ. सुजय विखे यांनी तर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांनी उमेदवापरी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसले याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करत भरण्यात आलेला आहे. आज नीलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज मोजक्याच लोकांनाबरोबर घेत भरण्यात आलेला आहे. या दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत नीलेश लंके यांची पध्दती नगरकरांना भावली. न कोठे गाजावाजा, ना कोठे वाहतुकीची कोंडी या सर्व बाबी न होता लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचीच चर्चा सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुरु झालेली आहे.
खासदार हा सर्वसामान्यातील माणूस असणे गरजेचे आहे. तसाच खासदार नीलेश लंके यांच्या रुपाने आपल्याला मिऴणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेऊन लंके यांच्या पाठीशी उभे रहावे, अशीच चर्चा सध्या गावा-गावांमध्ये सुरु आहे.
दरम्यान आपण आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असे जाधव यांनी सांगितले आहे. महायुतीच्या उमेदवारांविरोधात ही लढाई असून त्यांना चितपट करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला असे ते म्हणाले आहेत. गिरीश जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत नेत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्जामुळे शिवसेनेत बंडखोरी तर झाली नाही ना? चर्चांना पेव फुटले आहे.
Post a Comment