नगर ः महापालिका हद्दीत सध्या सिमेंट काॅंक्रिटीकरण रस्त्यांचे कामकाज सुरु आहे. ही कामे निकृष्ट सुरु आहे. याबाबत काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिका हद्दीतील उपनगरांसह बोल्हेगाव हद्दीत काही कामे सुरु आहेत. ही कामे निकृष्ट पध्दतीने झालेली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह मनपाच्या बांधकाम विभागातून बोलले जात आहे. मात्र या कामांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहेत. त्यातच रस्त्याची कामे करण्यास वेग आलेला आहे. मागील पाच वर्षात मात्र शहरासह उपनगरातील रस्त्यांची कामे झालेली नाही. मात्र आचारासंहिता जाहीर होण्याच्या अगोदरपासून शहरात कामांनी वेग घेतला आहे.
कामे अगोदर मंजूर झालेली असली तरी त्याचा फायदा उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर मंजूर कामे असली तरी ती तूर्त थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एखादे काम जर आचारसंहितेच्या अगोदर सुरु झालेले असेल तर ते पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र एखादे काम आता सुरु होत असेल तर असे कामे थांबविणे गरजेचे आहे. याचा मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत सध्या सुरु असलेली कामे त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी आता मतदारांमधून होत आहे. ही कामे न थांबविल्यास मनपा प्रशासनासह संंबंधित ठेकेदारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
ठेकेदाराची मनमानी
शहरात सध्या कामे सुरु आहेत. विकास कामात राजकारण कोणालाच करायचे नाही. परंतु ठेकेदारांकडून मनमानी पध्दतीने कामकाज सुरु आहे. अनेकांनी या कामामुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी ठेकेदारांकडे केलेल्या आहेत. मात्र ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत आता मनपाने त्वरित लक्ष घालावे, याबाबत न्यायालयीन लढाई लढली जाईल, असा इशारा शहरातील नागरिकांमधून देण्यात आलेला आहे.
Post a Comment