अकोले ः येथील कृषी बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या 6683 गोणी आवक झाली आहे. एक नंबर कांद्याला 1611 रुपयांचा भाव मिळाला.
तालुक्यातील कांदा पिकाची गुणवत्ता चांगली असल्याने इतर बाजार पेक्षा चांगल्या दराने विक्री होत आहे. त्याचा प्रत्यय आज गोल्टी बाजार भावामुळे दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवसी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाचे विक्रीस आलेल्या कांदा योग्य बाजार भाव मिळत आहेत.
कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी दुपारी एक ते रात्री साडेसात वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत केले जाईल, तसेच कांदा विक्री केल्यानंतर विक्री पट्टी पेमेंट रोख स्वरूपात आहे, याची हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समिततर्फे करण्यात आले आहे.
शेतकरी वर्गाने आपला शेतीमाल योग्य बाजार भाव, इलेक्ट्रॉनिक काट्यावर रास्त वजन,रोख पेमेंट मिळण्यासाठी बाजार समितीचे मुख्य बाजारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, बाजार समिती संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भावएक नंबर कांदा ः 1401 ते 1611, दोन नंबर कांदा ः 1201 ते 1400, तीन नंबर कांदा ः 801 ते 1000, गोल्टी/गोल्टा 1000ते1200, खाद ः 201 ते 800
Post a Comment