पहिल्याच दिवशी अहमदनगरसह शिर्डी मतदारसंघात 65 अर्जांची विक्री....

नगर ः लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २३ जणांनी ४२ अर्ज नेले. त्यात महायुतीचे उमेदवारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अभिजीत दिवटे यांनी दोन अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.२५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारलेे जाणार आहेत.


शिर्डी १८ एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दिनांक १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आज, गुरुवार दिनांक १८ एप्रिल पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post