मुंबई ः सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचारात सहभाग घेऊ नये, असा आदेश आहे. मात्र या आदेशाचे काटेकोरपालन केले जात आहे. परंतु काही शाळांच्या स्कूलचा लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते आणणे व नेण्यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे पालकांमधून शाळांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सभांचा धुराळा उडावलेला आहे. या धुराळ्यात नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांना वाहने देऊन आणले जात आहे. यामध्ये खासगी वाहनांचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सभांना येतअसल्याने वाहनांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे शाळाच्या स्कूलबसचा वापर केला जात आहे.
काही स्कूलबस शाळेच्या मालकीच्या आहेत. तर काही भाडेतत्वावर वापरल्या जात आहे. परंतु या बसवर शाळेचे नाव लिहिलेले आहे. त्यामुळे शाळा विशिष्ट पक्षाच्या बाजुने असल्याचा मेसेज समाजात आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा प्रकारांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
ज्या शाळांच्या बसचा वापर करण्यात आलेला आहे, अशा शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी आता काही सामाजिक संघटना पुढाकार घेणार असून अशा स्कूलबसचा वापर झालेल्या ठिकाणच्या तक्रारी करणार आहेत. त्यामुळे राज्यभर खळबळ उडणार आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांकडून किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींकडून उमेदवारा विषयी स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी त्या शिक्षकांवर कारवाई झालेली आहे. एकीकडे नोकरदारांना हा नियम तर खासगी शाळांचे नावे असलेल्या स्कूलबस निवडणूक कामासाठी कशा वापरता येतात, असा सवाल शिक्षकांमधून केला जात आहे. अशा इंग्रजी माध्यमांची मान्यताच रद्द करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
अहमदनगर शहरात काही सभा झालेल्या आहेत. या सभांना राज्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. या उपस्थितीला ने-आण करण्यासाठी स्कूलबसचा वापर करण्यतात आल्याची कार्यकर्त्यात चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वच सभांची चौकशी करून स्कूलबस ज्या शाळेच्या असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Post a Comment