कर्जत ः नगर लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या प्रचाराची गती वाढवली आहे. गावो गावी भेटी देऊन, ते लोकांना देशाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच योग्य पर्याय असल्याचे मतदारांना समजावून सांगत आहेत.
विकास कामाच्या मुद्यावर त्यांनी आपल्या प्रचार कायम ठेवला आहे. कर्जत तालूक्यातील मांदळी येथील गावात महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह आमदार राम शिंदे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
राम शिंदे म्हणाले की, डॉ. सुजय विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिलेदार असून त्यांना विजयी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे. आपला विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Post a Comment