शरद पवार यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे...

नगर ः शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मात्र ते नगरमध्येच पाच ते सहा सभा घेत आहेत. तर अजूनही काही कॉर्नर सभा ते घेणार असल्याचे मला कळले आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलणे हे हास्यास्पद असल्याचा टोला सुजय विखे यांनी शरद पवारांना लगावला आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात जास्तीत जास्त सभा व्हाव्या, यासाठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

यावरून भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात होणाऱ्या सभांवरून त्यांना टोला लगावला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post