नगर ः मागील पाच वर्षांपासून अहमदनगर लोकसभा मतदार संघात चहापेक्षा किटल्यांचा खडखडाट सुरु असून तो अद्यापही कायम आहे. हा खडखडाट बंद व्हावा, म्हणून काहींनी ज्येष्ठांसह कनिष्ठांचा कानावर सर्व प्रकार कार्यकर्त्यांनी घातला. आता जे झाले ते पुन्हा होणार नाही, असे म्हणून जुन्या गोष्टी सोडून नव्याने कामाला सुरवात करा, असा सल्लाही संबंधितांनी दिला. मात्र किटल्यांचा खडखडाट काही केल्या बंद झालेला नाही.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपासून किटल्यांचा खडखडाट अद्यापही सुरु आहे. कोणी या किटल्यांबाबत तक्रार केली तर मी मारल्यावाणी करतो तु लागल्यावाणी कर असाच कारभार केला जात आहे. मात्र किटल्यांवर काही परिणाम अद्याप झालेला दिसून येत नाही.
या किटल्यांच्या खडखडाटामुळे ग्रापंचायतसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य नाराज झालेले आहे. या किटल्यांनी या मान्यवरांना टोपी घालण्याचे कामे केलेली असून ज्येष्ठांच्या नावाखाली झाडाझडती घेतलेली आहे. आता तर काही गडबड केली तर आगामी काळात तुम्हाला कुठलीच मदत होणार नाही, असा इशारा दिला जात असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे.
हा खडखडात किटल्या परस्पर करीत असून याबाबत आता ज्येष्ठांसह कनिष्ठांनी लक्ष द्यावे, अन्यथा उर्वरीत दिवसात त्याचा पश्चात आगामी पाच वर्षे करावा लागेल, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. या किटल्यांमुळे कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, नगर शहरमधील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत.
दक्षिणेत उत्तरााधिकारी व्हायचे असेल तर सर्वात प्रथम सगळ्या किटल्या हटवाव्या लागतील, सर्वांसमोर किटल्यांमुळे झालेला त्रासाबद्दल माफीनामा करावा लागेल, तरच कार्यकर्ते आता जवळ येतील, अन्यथा पाच वर्षातील किटल्यांचा खडखडाटाचा आवाज आपल्याला पाच वर्षे भोगावा लागेल, अशीच चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. आता यावर ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment