नगर ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या लढतीत महायुतीच्या उमेदवारावर सर्वचजण नाराज आहेत. या नाराजीमुळे महायुतीचे उमेदवारांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यात नेत्यांना यश येत नसल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाच्या उमेदवारा दक्षिणेतील शरद पवार गटातील काही कार्यकर्त्यांकडून मदत केली जात असल्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेला आता उधाण आलेले आहे. नेमकी कोण मदत करतय यावर तर्कवितर्क लढविले जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत.
आता वंचितकडून उमेदवारी मिळवत उत्कर्षा रूपवते यांनी वाकचौरे व लोखंडे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून नवचैतन्य निर्माण केले आहे. यामध्ये महायुतीचे व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
उमेदवारांवरही कार्यकर्ते सध्या नाराज दिसून येत आहे. उत्कर्षा रुपवते निवडणुकीत उभे राहिल्याने महाविकास आघाडीसह महायुतीचे कार्यकर्ते आता रुपवते ायंच्या प्रचारात सक्रीय सहभागी होत आहेत.
Post a Comment