अतुल लहारे
नगर ः लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे सध्या आरोप- प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात केले जात आहे. परंतु श्रीगोंद्यातही प्रचाराने वेग घेतलेला आहे. मात्र श्रीगोंद्यातील परिस्थिती आता वेगळी दिसून येत आहे. भाजपचे स्थानिक महायुतीच्या उमेदवाराबरोबर फिरत असून कार्यकर्ते मात्र महाविकास आघाडीचा प्रचार करीत आहेत.
महायुती-महाविकास आघाडी यांच्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होत आहे. या निवडणुकीत सध्या तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरु आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक सध्या नाराजांची नाराजी दूर करत असले तरी ती नाराजी काही केल्या कमी झालेली दिसून येत आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने समाज माध्यमासह सर्वच क्षेत्रात प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ही आघाडी मिळवून देण्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्तेच महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे, हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर सध्या काळजी दिसून येत आहे. ही काळजी दिवसागणिक वाढत चालली आहे.
आता आगामी काळात नेत्यांचे सभा होणार आहे. या सभांच्या काळात कार्यकर्त्यांना जमवायचे कसे असाही प्रश्न सध्या महायुतीच्या नेत्यांपुढे उभा राहिला असल्याची चर्चा महायुतीच्या वर्तुळात सुरु आहे. पीए यांच्या वागण्यामुळे श्रीगोंद्यातील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. ही नाराजी उमेदवारासह मंत्र्यांनी काढलेली नाही. ते फक्त प्रमुख नेत्यांनाबरोबर घेऊन फिरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते नाराज आहेत. हीच नाराजी आगामी काळात पक्षाला चिंता करायला लावणारी ठरणार आहे.
श्रीगोंदे तालुक्यात भाजपसह महायुतीतील इतर पक्षांचे नेते आपण महायुतीच्या उमेदवाराबरोबर असल्याचे स्पष्ट करत आहे. तसे प्रसिध्द पत्रक प्रसिध्दीस देत आहे. मात्र प्रत्यक्षात नेते महायुतीबरोबर असून महत्वाचे कार्यकर्ते सध्या महाविकास आघाडीचा झेंडा हातात घेऊन प्रचार करीत असल्याचे चित्र सध्या मतदार संघात दिसत आहे.
भाजपसह अजित पवार गटाचे प्रमुख शिलेदार यांचे उजवे हातच सध्या महाविकास आघाडीबरोबर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे.
भाजपचे नेते आता प्रचाराच्या पध्दतीवर नाराजी व्यक्त करीत आहे. भाजपचे नेते श्रीगोंद्याऐवजी सर्वाधिक लक्ष पारनेरवर देत आहे. यावरूनच आता त्यांना श्रीगोंद्यापेक्षा पारनेरचे मतदार महत्वाचे वाटत आहे. त्यामुळेच आता आपणही महाविकास आघाडीबरोबर जात असल्याचे भाजपचे कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत. त्याचा परिणाम आगामी काळात निश्चितच दिसून येईल, अशी चर्चा सध्या भाजप वर्तुळात सुरु आहे.
Post a Comment