नगर ः पवार हे पाॅवर आहेत. त्यांच्या नादी लागू नका ते भल्याभल्यांना घरी बसवितात. संसदेत पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडणा आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथील न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेली ते बोलत होते.
या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, फौजिया खान, शेकापचे जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, अमर काळे, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी ामदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, प्रताप ढाकणे, नामदेवर पवार, संदीप वरपे आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले की, कांदा निर्यातबंदी व दूध दरवाढीबाबत आताच आंदोलन करायचे होते. पण साहेब म्हणाले, थोडी कळ काढ... आता दिल्तीत जाऊन ये मग आंदोलन कर... आता दिल्लीत जाऊन आलो की, गरेच आपली लढाई सुरु करणार आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडणार आहे. त्यांना न्याय नाही भेटला तर संसदच बंद पाडू, असा घणाघात लंके यांनी केला आहे. हा ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. जिल्ह्यातील बाराही आमदार महाविकास आघाडीकडे आणून घालतो, असे ते म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, काही चुका असतील तर कानात येऊन सांगा. शरद पवारांकडे तक्रार करा, पण जाहीरपणे व समाज माध्यमांवर बोलणे टाळा, पक्ष कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. शरद पवार देतील ती शिक्षा मी भोगेल, पण विधानसभेपर्यंत एकजुटीने काम करा, असे ते म्हणाले. रोहित पवा यांनी सोशल मीडियावर रावेर येथील निकालबाबत पक्षसंघटनेवर टीका केली होती. तो धागा पकडून जयंत पाटील यांनी भाषणात टोला लगावला.
Post a Comment