नेवासा ः आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार व्हावा, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी आता सर्वासमान्यांमधून नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
जुन्यांना डावलून आता नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास नक्कीच भाजपाला यश मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत नेवाशातून भाजप कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. या भेटीत जुन्या व सध्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्यांचा अहवाल आता प्रसासनाला सादर केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील काही नेत्यांची नावे येथे उमेदवारी मिळावी म्हणूनच चर्चेत येत आहे. मात्र तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत आहे. बाहेरी व्यक्ती आल्यानंतर लढत चुरशीची होणार नाही. त्यामुळे स्थानकि उमेदवार असणे गरजेचे आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काही झाले तरी नेवाशाची जागा भाजपला मिळवायची असेल तर उमेदवार बदलणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात भाजपाचे सचिन देसर्डा यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे. देसर्डा यांना उमेदवारी मिळावी, यासाठी नेवाशातील भाजप कार्यकर्ते लवकरच मुंबई येथे जाऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्षांसह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते देसर्डा यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
देसर्डा हे शांत स्वभावाचे असून त्यांचा तालुक्यात चांगला संपर्क आहे. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी ते चांगले प्रयत्न करतील. आता सध्या पक्षात जी गटबाजी सुरु आहे. ती थांबविण्यासाठी ते सक्षमपणे प्रयत्न करतील. ही गटबाजी थांबल्यानंतरच पक्षाला या मतदारसंघात यश मिळणार आहे. त्यामुळे त्यांनाच पक्षाने संधी द्यावी, अशी अपेक्षा सर्वासमान्य भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. काही सव्हे सध्या तालुक्यातील काहींनी केलेले आहे. यामध्येही सचिन देसर्डा यांनाच पसंती सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. आता पक्षानेही तसा सर्व्हे करून घ्यावा. म्हणजे देसर्डा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होईल, असे मत आता भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे.
Post a Comment