नगर - जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांनी बदलीतून सुटका मिळावी, यासाठी कायदेशीर घटस्फोट घेतलेले आहेत. मात्र घटस्फोटानंतरही संबंधित दाम्पत्य एकत्र रहात आहे. फक्त बदलीसाठी हा घटस्फोट घेतल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. जिल्हा परिषदेत घटस्फोट घेतलेले मोजके असले तरी त्यांची आकडेवारी प्रशासनाकडे असूनही नसल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या काही शिक्षत्रकांनी बनावट अंपग प्रमाणपत्र सादर करून बदलीतून सुटका मिळविलेली आहे. आता काही कर्मचाऱ्यांनी आपण आजारी असल्याचे भासवून बदलीतून सुटका मिळविलेले आहे. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काहींनी घरातील व्यक्ती आजारी असल्याचे कारण देऊन बदलीतून सुटका मिळविलेली आहे. तर काहींनी स्वतः आजारी असल्याचे भासवून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून बदलीतून सुटका मिळविलेली आहे.
बदलीतून विविध कारणे देऊन सुटका मिळविणाऱ्यांच्या कारणांची प्रशासनाने तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे त्यामुळे बोगसे कारणेदेऊन प्रशासन बदली प्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी झोल असल्याचीच चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. बदलीतून विविध कारणे दाखवून सुटका करून घेणारे व प्रशासनातील काही व्यक्ती यांच्या नेहमीच बदलीच्या अगोदर गाठीभेटी या मागे झालेल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचीच चौकशी होणे गरजेचे आहे.
बदलीतून सुटका मिळावी, म्हणून काहींनी घटस्फोट घेतल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत आहे. घटस्फोट घेतल्यानंतर संबंधित दाम्पत्य एकत्र राहत आहे. फक्त कागदोपत्री ते विभक्त आहेत. मात्र ते एकत्रच रहात आहे. अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करणे गरजचे आहे. याबाबत काहीनी तक्रारी केलेल्या आहेत. आगामी काळात काही संघटना याबाबत तक्रारी करण्याच्या तयारीत आहेत. याकडे आता प्रशासन कसे लक्ष देते, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
Post a Comment