मारहाणीत एकाचा मृत्यू... चौघांवर खूनाचा गुन्हा... दोघांना अटक

नगर :  शेळ्यांची चोरी करतो असे बोलून चौघांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. यात चांगदेव नामदेव चव्हाण या इसमाचा खून केल्याची घटना चार जुलैला पांगरमल (ता. नगर) येथे घडली आहे. 


या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महादेव आव्हाड, सरपंच अमोल आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, आजिनाथ महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड व गावातील इतर अनोळखी 20 ते 25 लोकांवर खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील महिलेने आपणास गावातून मारहाण करत ग्रामपंचायती समोर आणून जबर मारहाण करून विनयभंग केला असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

या घटनेतील सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांना कडक शासन करावे, अशी  मागणी होत आहे.  या घटनेने गावातील काही काळ तणावाचे वातावरण होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post